जगातील सर्वात मोठे कुटुंब भारतात नांदतय


100 खोल्यांच्या घरात राहतात 67 सदस्य
आयझोल
संस्कृती संवर्धन आणि संस्कृती रक्षण यासाठी भारतीय संस्कृतीचा नेहमीच परिचय करून दिला जातो एकत्र कुटुंब पद्धती हे भारतीय संस्कृतीचे महत्त्वचे वैशिष्ट्य आहे जरी आधुनिक कालावधीमध्ये त्यामध्ये बदल होत असला तरी जगातील सर्वात मोठे कुटुंब आजही भारतातच अस्तित्वात आहे या कुटुंबात तब्बल 167 सदस्य असून 100 खोल्यांच्या विशाल घरामध्ये हे सर्व सदस्य गुण्यागोविंदाने राहात आहेत मिझोराममधील चाना नावाच्या घराण्याची ही कहाणी आहे जगातील हे सर्वात मोठे कुटुंब  असल्याने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने सुद्धा या कुटुंबाची दखल घेतली होती पण आम्हाला कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी नको असल्याने आमचा समावेश विक्रम पुस्तकात करू नका अशी विनंती या कुटुंबाने केली आहे त्यामुळे या विक्रमाची नोंद गिनीज बुकमध्ये झालेली नाही जिओना चाना या व्यक्तीने या कुटुंबाची सुरुवात केली होती 2021 मध्ये वयाच्या 76व्या  वर्षी त्याचे निधन झाले तरीसुद्धा अजून हे कुटुंब अविभक्तच आहे जिओना चाना एका ख्रिस्त धर्माशी संबंधित पंथाशी निगडित होते ज्या पंथांमध्ये बहुपत्नीत्वाला परवानगी होती त्यामुळे जीओनाला 39 पत्नी होत्या या 39 पत्नी त्यांची 94 मुले आणि 30 पेक्षा जास्त नातवंडे मिळून आता हे 167 सदस्यांचे कुटुंब नांदत आहे शंभर खोल्या असलेल्या एका भव्य चार मजली हवेलीमध्ये हे कुटुंब राहत आहे मिझोराम मधील पर्वतीय प्रदेशातील बटवंग या गावात सध्या हे कुटुंब वास्तव्याला आहे या संपूर्ण कुटुंबाचं रोजचं जेवण एकाच किचनमध्ये तयार होतं ज्याच्यासाठी दररोज 45 किलो तांदूळ 30 ते 35 कोंबड्या 25 किलो डाळ शेकडो अंडी आणि 25 किलो भाज्या या व्यतिरिक्त 20 किलो फळे एवढी सामुग्री लागते राजकीयदृष्ट्या सुद्धा या कुटुंबाला महत्त्व आहे कारण हे कुटुंब म्हणजे एखाद्या छोटे गावच असल्यामुळे हे कुटुंब ज्या व्यक्तीला केव्हा पक्षाला मतदान करण्याचा निर्णय घेईल त्याचा नेहमीच निवडणुकीत विजय होतो असा आजपर्यंतचा अनुभव आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!