बंगळूरुमध्ये वाहने धुणाऱ्यांना दंड
पाणी टंचाईमुळे काटेकोर अंमलबजावणी
बंगळूरु
बंगळूरुमध्ये वाहने धुणाऱ्यांना दंड आकारण्यात येणार असून शुक्रवारपासून या नियमाची काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली आहे आतापर्यंत २२ जणांकडून जागीच १ लाख १ हजार रुपये दंडापोटी घेण्यात आले आहेत.मार्च महिना संपण्यापूर्वीच देशात पाणीटंचाई जाणविण्यास सुरुवात झाली आहे. आयटी-सिटी असा लौकिक असलेल्या कर्नाटकच्या राजधानी बंगळूरुमध्ये चक्क पाणीवापरावरून २२ जणांना दंड ठोठविण्यात आला आहे. तीन दिवसांतील या कारवाईत १.१ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत.बंगळूरुला पाण्याचा पुरवठा हा प्रामुख्याने कावेरी नदीतून केला जातो. याखेरीज महापालिकेने खणलेल्या कूपनलिकांचा वापर शहराची पाण्याची गरज भासविण्यासाठी केला जातो. मात्र यंदा पाऊस कमी झाल्याने पाणीटंचाईचे सावट आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठा व निस्सारण मंडळाने पिण्याच्या पाण्याचा अन्यत्र वापर करण्यावर बंदी घातली आहे. शुक्रवारपासून या नियमाची काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा जमिनीतील गोडया पाण्याची पातळी कमालीची घटली असून ५० टक्क्यांवर पाणीटंचाई जाणवत आहे. परिणामी गाडया धुण्याबरोबरच बांधकाम, कारंजी, चित्रपटगृहे किंवा मॉलमध्ये मनोरंजन आदीसाठी गोडया पाण्याचा वापर करण्यावर संपूर्णत: बंदी घालण्यात आली आहे.
बंगळूरु शहराची लोकसंख्या अंदाजे १.४० कोटी असून रोजची गरज सुमारे २,६०० दशलक्ष लिटर आहे कावेरी नदीतून दररोज १,४५० दशलक्ष लिटर पुरवठाकेला जातो
