तापसी पन्नूचे गुपचूप लग्न?


बॉयफ्रेंड मॅथियास बोई याच्यासोबत बांधली लग्नगाठ
जयपूर

Advertisement

बॉलिवूडमढील प्रख्यात आणि गुणी अभिनेत्री तापसी पन्नूही विवाहबंधनात अडकल्याची माहिती समोर येत आहे.तापसीने बॉयफ्रेंड मॅथियास बोई याच्यासोबत 23 मार्च रोजी गुपचूप लग्न केलं आहे. उदयपूर याठिकाणी तापसी आणि बॉयफ्रेंड मॅथियास यांचा विवाह संपन्न झाल्याची माहिती समोर आली आहे. तापसी पन्नू आणि माजी ऑलिम्पिक पदक विजेता मॅथियास बो यांनी कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले. विवाह सोहळा अत्यंत गुपित ठेवण्यात आला होता. प्री-वेडिंग कार्यक्रमांची सुरुवात 20 मार्चपासून झाली.तापसी पन्नूच्या लग्नाला बॉलिवूडच्या प्रसिद्ध सेलिब्रिटींना आमंत्रित केलं नव्हतं. अभिनेत्रीने इंडस्ट्रीतील फक्त तिच्या जवळच्या मित्रांना, अनुराग कश्यप आणि कनिका ढिल्लों यांनी आमंत्रित केले होते.
मॅथियास बोई हा डेन्मार्कचा रहिवासी आहे. बॅडमिंटनपटू म्हणून तो ऑलिम्पिक पदक विजेता आणि युरोपियन चॅम्पियन आहे. मात्र, 2020 मध्ये तो निवृत्त झाला. बॅडमिंटन विश्वात तापसीच्या बॉयफ्रेंडचं नाव फार मोठं आहे. सोशल मीडियावर मॅथियासचे फोटो देखील व्हायरल होत असतात.तर, 2013 पासून तापसी बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. ‘चश्मे बद्दूर’ हा तापसीची पहिला सिनेमा आहे. नुकताच तापसी अभिनेता शाहरुख खान याच्यासोबत डंकी सिनेमात दिलसली होती.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!