रेल्वेमध्ये 9000 पदांसाठी भरती


दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी

नवी दिल्ली

Advertisement

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेषतः दहावी पास असणाऱ्यांसाठी ही एकप्रकारची सुवर्णसंधीच म्हणावी लागेल.रेल्वे विभागाकडून तब्बल 9000 हून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही आरामात या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 एप्रिल 2024 आहे. त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे दहावी पासची मार्कशीट असणे आवश्यक आहे. यासोबत या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट देखील लागू करण्यात आलीये.रेल्वेकडून ही भरती प्रक्रिया टेक्नीशियन पदांसाठी राबवली जात आहे. 18 ते 33 वयापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. उमेदवाराची निवड ही परीक्षेमधून केली जाईल. यानंतर कागदपत्रांची तपासणी केली जाईल आणि शेवटी उमेदवाराचे मेडिकल होईल आणि मग निवड यादी ही रेल्वे विभागाकडून जाहिर केली जाईल.या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 500 रूपये फी भरावी लागेल. प्रवर्गातील उमेदवारांना 250 फी भरावी लागेल. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी https://indianrailways.gov.in/railwayboard/ या साईटवर जावे लागेल. तिथेच आपल्याला या भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती मिळेल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!