चेन्नईचं नेतृत्व ऋतुराजकडे


धोनीचा वारसा चालवणार
चेन्नई: देशभर आयपीएलच्या 17 पर्वाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील लढतीनं 2024 च्या आयपीएलची सुरुवात होईल. चेन्नईला पाचवेळा विजेतेपद मिळवून देणाऱ्या महेंद्रसिंह धोनी ऐवजी आता युवा खेळाडू ऋतुराज गायकवाडकडे नेतृत्त्व दिलं आहे.
ऋतुराज गायकवाडनं 2019 मध्ये चेन्नईच्या टीममध्ये पदार्पण केलं होतं. अवघ्या चार वर्षानंतर ऋतुराज गायकवाडला चेन्नईच्या नेतृत्त्वाची संधी मिळाली आहे.
ऋतुराज गायकवाडचा जन्म 31 जानेवारी 1997 ला झाला होता. ऋतुराज गायकवाडनं 2016-17 च्या रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राच्या संघातून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. आयपीएलमध्ये 2019 मध्ये ऋतुराज गायकवाडचा चेन्नई सुपर किंग्जच्या संघात समावेश आहे. ऋतुराज गायकवाडला चेन्नईच्या संघानं 2019 ला केवळ 20 लाख रुपयांच्या बेस प्राइजमध्ये संघात घेतलं होतं.महाराष्ट्राकडून खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाडनं विजय हजारे ट्रॉफीत 7 मॅचमध्ये 63.42 च्या सरासरीनं 444 धावा केल्या होत्या. जून 2019 मध्ये भारत ए टीमकडून खेळतानं त्यानं श्रीलंका ए संघाविरुद्ध 186 धावा केल्या होत्या.

Advertisement

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नई सुपर किंग्जनं पाचवेळा विजेतेपद मिळवलं आहे.2010, 2011, 2018, 2021 आणि2023 च्या आयपीएलमध्ये चेन्नईनं विजेतेपद मिळवलं होतं.गेल्यावर्षी दुखापतग्रस्त असताना देखील धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नईनं विजेतपद मिळवलं होतं. चेन्नईनं अंतिम फेरीत गुजरात टायटन्सचा पराभव केला होता. आता महेंद्रसिंह धोनी ऐवजी संघाच्या नेतृत्त्वाची धुरा ऋतुराज गायकवाड याच्याकडे आली आहे.2024 च्या आयपीएलमध्ये विजेतेपद मिळवून देण्याचं आव्हान ऋतुराज गायकवाड समोर असेल.
दरम्यान, ऋतुराज गायकवाडकडे चेन्नईचं नेतृत्त्व येण्यापूर्वी महेंद्रसिंह धोनी, रवींद्र जडेजा आणि सुरेश रैनानं केलं आहे. आता ऋतुराज गायकवाडला धोनीचा वारसा पुढं चालवावा लागणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!