रोहित हार्दिक गळाभेट
मुंबई इंडियन्सच्या ट्रेनिंग सेशनमधला व्हिडीओ व्हायरल
मुंबई : यंदाच्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधार केलं आहे. यामुळे दोघांमध्ये बिनसलं असल्याची चर्चा रंगली होती. दोघांच्याही चाहत्यांकडून ट्रोल केलं जात आहे.दरम्यान, दोन्ही खेळाडूंच्या ऑन द फिल्ड वागण्यामुळे आता त्यांच्यात बिनसल्याच्या दाव्यांमधली हवा निघाली आहे.मुंबई इंडियन्सच्या ट्रेनिंग सेशनमध्ये हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा यांच्यातलं बाँडिंग दिसून आले आणि त्यांनी थेट गळाभेट घेतली.
रोहित शर्मा उशिराने मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात पोहोचला. त्याने आयपीएलची तयारी सुरू केली असून व्हिडीओ समोर आला आहे. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना २४ मार्च रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध होणार आहे.सध्या त्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मुंबई इंडियन्सने बुधवारी सायंकाळी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. मुंबई इंडियन्सच्या ट्रेनिंग सेशनमधला हा व्हिडीओ आहे. मुंबई इंडियन्सचे प्लेअर उभा असून त्यात रोहित आणि हार्दिकसुद्धा दिसत आहे. रोहित शर्माला पाहताच हार्दिक पांड्या त्याला भेटण्यासाठी गेला. रोहित त्याच्या हातात हात देत होता. पण तोपर्यंत पांड्याने थेट गळाभेट घेतली.
𝟰𝟱 🫂 𝟯𝟯#OneFamily #MumbaiIndians | @hardikpandya7 @ImRo45 pic.twitter.com/eyKSq7WwCV
— Mumbai Indians (@mipaltan) March 20, 2024
