पुतिन पाचव्यांदा रशियाच्या अध्यक्षपदी
निवडणुकीत ८७ टक्के मते मिळाल्याचा दावा
मॉस्को
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवून पाचव्यांदा सत्तेत आले पुतिन यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक 87% मतांनी जिंकली, बॅलेट पेपरवर पुतिनच्या तीन विरोधकांना सुमारे 3-4% मते मिळविली.
युद्धविरोधी उमेदवारांना निवडणुकीपासून प्रतिबंधित करण्यात आले होते आणि बहुतेक रशियन विरोधी व्यक्ती एकतर स्व-निर्वासित आहेत, तुरुंगात आहेत किंवा रशियामध्ये मारले गेले आहेत
रशियन घटनेतल्या तरतुदीनुसार कुणीही दोन टर्म पूर्ण झाल्यानंतर लगेच राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकत नाही. त्याप्रमाणे 2008मध्ये पुतिन यांचा कार्यकाळ संपायला हवा होता.पण, पुतिन यांनी राष्ट्राध्यक्षपद सोडलं आणि ते एक पायरी उतरून पुन्हा पंतप्रधान झाले. पंतप्रधान असतानाही सगळे प्रमुख निर्णय पुतिनच घ्यायचे एवढी त्यांची पक्षावर पकड होती.पुन्हा 2012मध्ये पुतिन राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. मग आपला दुसरा कार्यकाळ संपत असताना 2021 मध्ये त्यांनी देशात घटनादुरुस्ती केली. राष्ट्राध्यक्षाच्या कार्यकाळाची मर्यादा आठ वर्षांऐवजी सोळा वर्ष एवढी केली.
15 ते 17 मार्च 2024 रोजी झालेल्या निवडणुकीत पुतिन यांना 87% मते मिळाल्याचा दावा त्यांच्या पक्षानं केला आहे. या निकालावरही शंका घेतली जाते आहेच. पण पुतिन यांनी आता आणखी सहा वर्षांसाठी आपणच राष्ट्राध्यक्षपदी राहणार यावर शिक्कामोर्तब केलं आहे.
गेल्या २५ वर्षात रशियावर पुतिन यांची पकड घट्ट होत गेली. 1999 मध्ये आधी काळजीवाहू पंतप्रधान, मग राष्ट्राध्यक्ष, मग पंतप्रधान आणि मग पुन्हा राष्ट्राध्यक्ष या नात्यानं पुतिनच रशियाचे सत्ताधीश राहिले.आंतरराष्ट्रीय राजकारणातही पुतिन यांचा दबदबा राहिला आहे आणि त्यांच्याविषयी अनेक कहाण्या समोर येत राहतात. त्यात विरोधकांना त्यांनी कसं चिरडलं, हेही सांगितलं जातं.केजीबी या हेरगिरी करणाऱ्या रशियन संस्थेतले गुप्तहेर ते एक प्रकारे रशियाचे अनभिषिक्त सम्राट या पुतिन यांच्या प्रवासाविषयी बोलताना त्यांचे समर्थक एका माचोमॅनची प्रतिमा उभी करतात.