शिये गावाला निधी कमी पडू देणार नाही


खा. धनंजय महाडिक,काँक्रिट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
कोल्हापूर
शिये हे गाव महाडिक परिवारावर पहिल्यापासून प्रेम करणारे आहे, त्यामुळे निधी मागण्यासाठी तुम्ही कमी पडू नका, आम्ही देतानाही कुचराई करणार नाही, असे आश्वासन खासदार धनंजय महाडिक यांनी दिले.
खा. महाडिक यांच्या विशेष प्रयत्नातून शिये (ता. करवीर) येथे मंजूर करण्यात आलेल्या काँक्रिट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ खा. महाडिक यांच्याहस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
शियेतील प्रभाग क्रमांक 6 मधील नाईक धाबा ते महालक्ष्मी हॉस्पिटल या रस्त्यासाठी खासदार महाडिक यांनी दहा लाखाचा निधी उपलब्ध करुन दिला. यावेळी सरपंच सौ. शीतल मगदूम यांनी गावातील विविध विकास कामांना आवश्यक असणार्‍या निधीची माहिती दिली. त्यावर बोलताना खा. महाडिक म्हणाले की, सरकारकडे भरपूर निधी उपलब्ध आहे. आचारसंहिता संपल्यानंतर तुम्ही मागणी केलेल्या सर्व कामांना निधी उपलब्ध करुन दिला जाईल. गावातील मरगूबाईचे मंदिर बांधण्यासही सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. यावेळी शरद काशिद यांना भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष निवडीचे पत्रही खा. महाडिक यांच्या हस्ते देण्यात आले.
या कार्यक्रमास राजाराम साखर कारखान्याचे संचालक विलास जाधव, भाजप जिल्हा सरचिटणीस शिवाजीराव बुवा, आनंद गुरव, तालुकाध्यक्ष दत्ता मेडशिंगे, उपाध्यक्ष बाबासो चव्हाण, भाजप महिला जिल्हा चिटणीस सौ. स्मिता चरणकर, लक्ष्मण काशिद, महादेव दूध संस्थेचे चेअरमन किरण चौगले, जयसिंग पाटील, बाळासो माने, यशवंत मगदूम, पत्रकार विश्वास चरणकर, जयसिंग काशिद, दिपक इंगवले, डॉ. विलास सातपुते, डॉ. सुषमा सातपुते, मच्छिंद्र मगदूम, जालिंदर मगदूम, वैभव नाईक, उत्तम गाडवे, बाबासो बुवा, राम बुवा, तसेच ग्रामपंचायत सदस्य विश्वास पाटील, विलास गुरव, रेखा जाधव, निलेश कांबळे, तेजस्विनी पाटील आदी उपस्थित होते.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!