अभिनेत्री क्रांती रेडकरला ठार मारण्याची धमकी
पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
मुंबई
मराठी अभिनेत्री आणि माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकरला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे धमकी देणारे फोन कॉल्स तिला आले आहेत. यानंतर क्रांतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. क्रांती रेडकरला पाकिस्तानी क्रमांकावरुन ठार करण्याच्या धमक्या आणि अश्लील संदेश पाठवण्यात आले आहेत
ए एन आय ने दिलेल्या वृत्तानुसार क्रांती रेडकरला ठार मारण्याच्या धमक्या या पाकिस्तानी क्रमांकावरुन आल्या आहेत. तसंच अश्लील मेसेजही पाठवण्यात आले आहेत. या सगळ्या संदर्भात क्रांतीने गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसंच क्रांतीने या सगळ्या प्रकरणी स्क्रिन शॉट पोस्ट केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद फडणवीस आणि मुंबई पोलिसांना टॅग करत या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.