फ्रान्समध्ये गर्भपात घटनात्मक अधिकार


गर्भपाताचा हक्क राज्यघटनेत देणारा फ्रान्स जगातील पहिला देश

पॅरिस
फ्रान्सने आता महिलांना गर्भपात करण्याचा घटनात्मक अधिकार दिला आहे. यासाठी फ्रान्सच्या संसदेतील सदस्यांनी महिलांना ‘स्वातंत्र्याची हमी’ या 1958 च्या कायद्यात सुधारणा करण्यासाठी मतदान केलं. संसदेत या कायद्याच्या सुधारणेच्या बाजूने 780 मतं पडली. तर विरोधात 72 मतं होती.महिलांना गर्भपाताचा अधिकार देणारं हे सुधारणा विधेयक मंजूर होताच संसदेतील सदस्यांनी उभं राहून, या घटनादुरुस्तीचं स्वागत केलं.दरम्यान, गर्भपात विरोधी संघटनांनी या सुधारणा विधेयकाला तीव्र विरोध दर्शवला आहे.रोमन कॅथलिक चर्चचे मुख्यालय व्हॅटिकन या विरोधात आहेत.

Advertisement

फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूअल मॅक्रो यांनी ही फ्रान्ससाठी अभिमानाची बाब असल्याचं म्हटलं. तसंच या निर्णयामुळे संपूर्ण जगाला जगाला एक संदेश मिळेल असंही ते म्हणाले.फ्रान्समध्ये 1975 पासून गर्भपात करणं कायदेशीर आहे परंतु देशाच्या 85 टक्के नागरिकांचा कल, हा अधिकार राज्यघटनेतून मिळावा याकडे होता.
इतर अनेक देशांनी प्रजनन हक्क त्यांच्या राज्यघटनेत दिलेले असताना गर्भपाताचा हक्क राज्यघटनेत देणारा फ्रान्स हा जगातील पहिला देश ठरला आहे.
फ्रान्सच्या या ऐतिहासिक घटना दुरुस्तीनंतर पॅरिस येथील आयफेल टाॅवरवरती रोषणाई करण्यात आली. तसंच ‘माय बाॅडी, माय चाॅईस’ हा संदेशही लिहिण्यात आला होता.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!