रविवारी हिंदी मराठी गाण्यांचा बहारदार कार्यक्रम


दीपलक्ष्मी पतसंस्था व सुकूनतर्फे आयोजन
सातारा:
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व अमरेंद्र रविंद्र मोटे सर द्वारा “सुकून” यांच्या संयुक्त विद्यमाने सुमधुर नव्या जुन्या हिंदी मराठी कराओके गाण्यांचा बहारदार कार्यक्रम रविवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी रोजी सायंकाळी 5.30 वा. दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे होणार आहे.आपली आवड: भाग 3 मालिकेत व्हॅलेंटाईन स्पेशल प्रेम गीते सादर केली जाणार आहेत या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके व दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था चेअरमन शिरीष चिटणीस उपस्थित राहणार आहेत. यावेळी गायक कलाकार विनायक लोहार, जुबेर शेख, नंदकिशोर मोरे, प्रदीप पवार, मधुकर शेंबडे, मीना गोंदकर, संगीता वाघमारे आणि रविंद्र मोटे सर विविध हिंदी मराठी प्रेम गीते सादर करणार आहेत. सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!