अमेरिका आणि इराणमधील तणाव टोकाला


कोणत्याही क्षणी युद्धाचा भडका उडणार

Advertisement

वॉशिंग्टन
अमेरिका आणि इराणमधील तणाव टोकाला पोहोचला असून कोणत्याही क्षणी युद्धाचा भडका उडू शकतो पँटागॉनच्या हालचालींमुळे जागतिक महायुद्धाची भीती वाढली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प निर्णायक निर्णय घेऊ शकतात.गेल्या काही दिवसांपासून ज्याची भीती होती अखेर तेच खरं होतंय की काय असं चित्र सध्या निर्माण झालं आहे. रशिया युक्रेन संघर्षानंतर आता अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचत आहे. जागतिक संकटाची भीती व्यक्त केली जात होती, ते आता उंबरठ्यावर येऊन ठेपलं आहे. अमेरिका आणि इराणमधील तणाव अशा वळणावर पोहोचला आहे, जिथून परतीचे सर्व मार्ग बंद होताना दिसत आहेत. राजनैतिक चर्चेसाठी आता केवळ ४८ तासांचा कालावधी उरल्याचे मानले जात असून, त्यानंतर पँटागॉनकडून मोठी लष्करी कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. या घडामोडींमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे.
अमेरिकेच्या संरक्षण विभागाकडून मिळणाऱ्या माहितीनुसार, येत्या तीन दिवसांत मध्य पूर्वेतील काही महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांना तातडीने बाहेर काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इराणकडून होणाऱ्या संभाव्य पलटवाराचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. ही ‘शिफ्टिंग’ प्रक्रिया म्हणजे मोठ्या युद्धाची नांदी तर नाही ना? अशी शंका आता उपस्थित केली जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!