चला चिऊ वाचवू अभियानअंतर्गत विविध स्पर्धां


चला चिऊ वाचवू अभियानअंतर्गत विविध स्पर्धां

सातारा

जागतिक चिमणी दिनानिमित्ताने अलाईव्ह संस्थेद्वारा चला चिऊ वाचवू अभियानअंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे वाढत्या शहरीकरणात आपल्या परिसरात रोज सहज दिसणारी चिमणी आत्ता दुर्मिळ होऊ लागली आहे. निसर्गचक्रात महत्वाची भूमिका बजावणारी चिमणी गाणी-गोष्टीतच राहून जाऊ नये म्हणून अलाईव्ह संस्था चला चिऊ वाचवू अभियान राबवत असून अभियानाचे हे 9वे वर्ष आहे. जनजागृतीसह चिऊ संवर्धनात लोकसहभाग वाढावा यासाठी अभियानंतर्गत आयोजित विविध कला व साहित्य स्पर्धा होणार आहेत

चिमणी चित्रकला     कोणत्याही माध्यमात A4/A3 आकाराच्या कागदावर स्वतः तयार केलेलं चिमणी विषयी चित्र.

Advertisement

चिमणी कथा  स्वानुभवावर/काल्पनिक स्वरचित चिमणीची कथा मराठी, गुजराती, हिंदी, इंग्रजी यापैकी कोणत्याही भाषेत पाठवता येईल. शब्दमर्यादा 300.

चिमणी कविता चिमणीवर मराठी, गुजराती, हिंदी, इंग्रजी यापैकी कोणत्याही भाषेत स्वरचित कविता पाठवावी.

चित्र/कथा/कविता/घोषवाक्य स्वरचितच असावे, इंटरनेट किंवा अन्य कोणत्याही ठिकाणाहून कॉपी केलेले नसावे

सहभागासाठी https://forms.gle/4ARv5msVpLyjfwQT8 या लिंकवर गुगल फॉर्म भरुन आपली रचना अपलोड करावी लागणार आहे

स्पर्धा कालावधी ५ मार्चपर्यंत आहे हि स्पर्धा सर्व वयोगटांसाठी विनामूल्य खुली असून कोणीही सर्व स्पर्धेत सहभाग घेऊ शकतात, प्रत्येक स्पर्धेत फक्त एकच रचना पाठवू शकता.स्पर्धेचा निकाल व पारितोषिक वितरण समारंभ रविवार दिनांक 17 मार्च 2024 रोजी होणाऱ्या कार्यक्रमात करण्यात येईल


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!