राजकुमार संतोषी दाद मागणार
राज कुमार संतोषी दाद मागणार
मुंबई
प्रसिद्ध हिंदी चित्रपट निर्माते दिग्दर्शक राज कुमार संतोषी पुन्हा चर्चेत आहेत. चेक बाऊन्सप्रकरणी शनिवारी जामनगर कोर्टाने त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली. यासोबतच त्यांना दोन कोटी रुपये भरण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
आता याप्रकरणी संतोषीचे वकील बिनेश पटेल यांनी ‘याप्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आम्ही दाद मागणार आहोत. सध्या न्यायालयाने या निर्णयाला 30 दिवसांसाठी स्थगिती दिली असून संतोषी यांना जामीन मंजूर केला आहे.असे म्हटले आहे
राजकुमार संतोषी यांनी 2015 मध्ये जामनगरचे व्यापारी अशोक लाल यांच्याकडून 1 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. हे संपूर्ण प्रकरण त्याच कर्जाचे आहे.
‘संतोषी यांनी त्यांच्याकडून पैसे घेतल्याचा कोणताही कागदोपत्री पुरावा फिर्यादीने अद्याप सादर केलेला नाही. त्रयस्थ व्यक्तीने पैसे गोळा केल्याचे खुद्द फिर्यादीने मान्य केले आहे. त्या बदल्यात त्रस्थाला 10 लाख रुपयांचे 11 धनादेश दिले, ज्याची संतोषी यांना माहिती नव्हती.असा दावा वकिलांनी केला आहे
सध्या संतोषी आमिर आणि सनीसोबत त्यांच्या पुढच्या चित्रपटावर काम करत आहेत. आमिर या चित्रपटाचा निर्माता आहे.या प्रकरणावर माध्यमांशी संवाद साधताना संतोषी म्हणाले, ‘हे प्रकरण अतिशय व्यवस्थित संपेल. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मी माझा पुढचा दिग्दर्शकीय चित्रपट ‘लाहोर 1947’ शूट करणार आहे. माझे संपूर्ण लक्ष कामावर आहे.
